कदम वाकवस्ती येथे छ. शिवाजी महाराज व छ. संभाजी महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत

लोणी काळभोर, ७ जानेवारी २०२१: स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य, यांच्या तर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा, पुण्यश्लोक छत्रपती श्री. शिवाजी महाराज व छत्रपती श्री. संभाजी महाराज पालखी सोहळा, शिवजन्मभुमी दुर्ग श्री. शिवनेरी ते शंभु जन्मभुमी दुर्ग श्री. पुरंदर या वर्षी सुध्दा पार पडत आहे.

कोरोना महामारीचे संकट आपल्या देशावर असताना, प्रतीवर्षी पायी साजरा होणारा सोहळा या वर्षी मात्र वाहनांमधुन होत आहे. कोरोना संदर्भात शासनाने घालुन दिलेले सर्व नियमानुसार हा सोहळा या वर्षी २ दिवसांमध्ये पार पडत आहे. बुधवार दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता दुर्ग शिवनेरी येथे शिवरायांना अभिषेक करुन सोहळ्याचे प्रस्थान झाले आहे.

छत्रपती श्री. संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ वढु बु मार्गे श्री. क्षेत्र थेऊर चिंतामणी मंदिर येथे पहिल्या दिवसाचा मुक्काम होता. तर दुसरा दिवस गुरुवारी दि. ७ जानेवारी लोणी काळभोर स्टेशन, फुरसुंगी- वडकी, सासवड मार्गे दुर्ग श्री. पुरंदर येथे जाईल. व संभाजी महाराजांचा अभिषेक होऊन या सोहळ्याची सांगता होईल, अशी माहिती स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व सोहळा प्रमुख ह.भ.प श्री. बाजीराव महाराज बांगर यांनी दिली आहे.

आज सकाळी ९ वाजता लोणी स्टेशन येथे पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. फुलांच्या वर्षावात, व शिव-शंभुंच्या घोषणेने परिसर दमदमुन गेला होता.

यावेळी महाराष्ट्र राज्य बांबु विकास महामंडळाचे संचालक श्री. बाळासाहेब सपकाळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, राज्य दैनिक बाळकडू पत्रकार ज्ञानेश्वर शिंदे, बाप्पुसाहेब सोनवणे, निलेश हांडे, सशक्त भारत चे कार्यकर्ते अक्षय जगताप, आर्याज् इंग्लिश मेडीयम स्कुलचे अध्यक्ष रोहन आप्पा सपकाळ उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा