वॉशिंग्टन, ८ जानेवारी २०२१: ॲमेझॉन च्या जेफ बेझोस यांना मागे ठेवून टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. एलन मस्क यांची संपत्ती १८८ बिल्लियन यु एस डॉलर पेक्षा जास्त झाली आहे जी ॲमेझॉन चे संस्थापक जेफ बेजॉस यांच्या एकूण संपत्ती १८७ बिल्लियन यु एस डॉलर च्या पेक्षा १ बिल्लियनने जास्त आहे. याचे कारण टेस्ला कंपनीच्या शेअर प्राईज मध्ये सातत्याने होणारी वाढ आहे
इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्लाचे मालक एलोन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. ब्लूमबर्गने जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या यादीत त्यांनी अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांना मागे ठेवले आहे. या यादीमध्ये ५०० अब्जाधीशांचा समावेश आहे. बेझोस २०१७ पासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होती.
हा पराक्रम गाजवल्यानंतर मस्क यांनी आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली. एका ट्विटर वापरकर्त्याला प्रत्युत्तर देताना त्यांनी टिप्पणी केली, “काय विचित्र गोष्ट आहे”.
२०२० कदाचित जगासाठी सामान्य नसेल, परंतु एलोन मस्कसाठी मागील १२ महिने उत्कृष्ट राहिले. २०२० च्या सुरुवातीस सुमारे २७ बिल्लियन अमेरिकन डॉलर्सच्या मूल्याने आपली सुरुवात करताना त्यांची संपत्ती १५० बिल्लियन डॉलर्सने वाढविली, जे त्यांच्यासाठी वेगवान आर्थिक बदलाचे लक्षण आहे. जर आतापर्यंतच्या इतिहास आपण बघितला तर संपत्तीत वृद्धी करणारे ते सर्वात वेगवान व्यक्तींमध्ये समाविष्ट होतील. यात टेस्ला यांचे मोठे योगदान आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे