इस्लामाबाद, १० जानेवारी २०२१: पाकिस्तानमध्ये रात्री उशिरा अचानक वीज खंडित झाली. त्यामुळे कराची, लाहोर, पेशावर, इस्लामाबाद, मुलतान आणि रावळपिंडी यासह अनेक मोठी शहरे पूर्णपणे अंधारात बुडून गेली. डॉन न्यूजच्या म्हणण्यानुसार जवळपास संपूर्ण देशात अचानक ब्लॅकआउट झाला आहे.
इस्लामाबादचे उपायुक्त हमजा शफाकत यांनी ट्वीट केले की, “नॅशनल ट्रान्समिशन अँड डिस्पॅच कंपनी सिस्टम (एनटीडीसी) च्या ट्रिपिंगमुळे हा ब्लॅकआउट झाला आहे. थोड्या वेळाने सर्व ठीक होईल. लोक ट्रिपिंग दुरुस्त करण्याचे काम करीत आहेत.”
दुसरीकडे एक्सप्रेस ट्रिब्यूनने पॉवर डिव्हिजन प्रवक्त्याचे हवाला देत सांगितले की, एनटीडीसीचे संघ राष्ट्रीय वितरण व्यवस्थेची फ्रीक्वेंसी अचानक कमी होण्याचे कारण शोधण्यासाठी काम करत आहेत.
त्याच वेळी, पाकिस्तानच्या वीज मंत्रालयाने ट्विटरद्वारे माहिती दिली की, “अचानक वीज ट्रान्समिशन सिस्टमची फ्रीक्वेंसी ५० ते ० पर्यंत कमी झाल्याने देशभरात ब्लॅकआउट झाला.” मंत्रालयाच्या माहितीनुसार ही तांत्रिक समस्या ११.४१ वाजेच्या सुमारास आली. मंत्रालयाने लोकांना संयम बाळगायला सांगितले आहे. आत्तापर्यंत, वीजप्रवाह व्यवस्थित पद्धतीने सुरू केली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे