बारामती २५ जानेवारी २०२१: भारतातील लोकशाही बळकट करताना युवकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावून याबाबत नागरीकांमध्ये जनजागृतीचे कार्य करुन देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी महत्वाचे योगदान द्यायला हवे,असे आवाहन आज सोमवार ( दि.२५) रोजी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तहसिल कार्यालयात प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सहा.नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार विजय पाटील, निवडणूक नायब तहसिलदार पी.डी.शिंदे, नायब तहसिलदार संजय गांधी योजना भोसले, तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.भारतीय लोकशाही बळकट व सक्षम होण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.लोकशाही बळकट करण्याचे काम मतदार नोंदणीतून आणि मतदानामध्ये सक्रीय सहभागातून होत असल्याने युवकांनी पुढाकार घेऊन १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक पात्रताधारक भारतीय नागरिकाला मतदानाचा पवित्र हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक विभागामार्फत प्रचार व प्रसार मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले.
निवडणूक आायोगाचा २५ जानेवारी स्थापना दिवस आहे.हा दिवस देशभरामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मतदारामंध्ये मतदाना विषयी जनजागृती व्हावी, नवीन मतदार नोंदणी व्हावी या उद्देशाने या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .मतदानासारख्या पवित्र कर्तव्यापासून कोणी वंचित राहू नये असेही कांबळे यावेळी म्हणाले.आज पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये नवमतदार विद्यार्थ्यांना मतदान ओळखपत्राचे वितरण करण्यात आले.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव