मुंबई, २६ जानेवारी २०२१: शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) कंपनीने डिसेंबर तिमाहीत निकाल जाहीर केला. आरआयएलच्या तिमाही निकालामुळे गुंतवणूकदारांमध्ये समाधानकारकता दिसली नाही, यामुळे सोमवारी रिलायन्सच्या शेअर्समध्ये जोरदार नफा बुकिंग झाला.
सोमवारी, आरआयएलच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यामुळे ट्रेडिंग सुरू असताना ही कंपनी दुसर्या क्रमांकावर गेली. दुसरीकडे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला मागे टाकत मार्केट कॅप च्या बाबतीत देशातील सर्वात मूल्यवान कंपनी बनली.
दुपारच्या ट्रेडिंग दरम्यान टीसीएसचे मार्केट कॅप १२,४५,३४१.४४ कोटी रुपये होते, तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (आरआयएल) बाजार भांडवल १२,४२,५९३.७८ कोटींवर घसरले.
तथापि, ट्रेडिंगच्या शेवटी, आरआयएल पुन्हा मार्केट कॅपच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर पोहोचली. ट्रेडिंगच्या शेवटी टीसीएसकचे १२.१७ लाख कोटींचे मार्केट कॅप होते, तर रिलायन्सचे मार्केट कॅप १२.७६ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आता अंतर खूपच कमी झाले आहे.
आरआयएलचा तिमाही निकाल गुंतवणूकदारांना खूष करू शकला नाही, त्यामुळे एनएसईमध्ये सोमवारी हा शेअर ५.५८ टक्क्यांनी घसरून १,९३५ वर बंद झाला. याउलट टीसीएस शेअर किरकोळ ०.१५ टक्क्यांनी घसरून ३,२९८ रुपयांवर बंद झाला.
महत्त्वपूर्ण म्हणजे, मार्च -२०२० मध्ये टीसीएसने सर्वात मोठ्या कंपनीची स्थिती गमावली, जी सोमवारी शेअर बाजारातील ट्रेडिंग दरम्यान परत आली. कंपन्यांच्या बाजार भांडवलात दरांच्या चढ-उतारांमुळे दररोज बदल होत असतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे