मुंबई, २९ जानेवारी २०२१: येत्या सोमवार म्हणजेच १ फेब्रुवारीपासून मुंबईकरांची लाईफ लाईन अर्थात लोकल आता सर्वसामान्यासाठी धावणार असल्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. ज्यामुळे आता मुंबईकरांना कुठेतरी दिलासा भेटेल. आशी भावना व्यक्त होत आहेत.
तर राज्य शासनाने यासाठी नियमावली दिली आहे. ज्यामधे सकाळी ७ ते १२ आणि दुपारी ४ ते ९ या वेळेत सर्वसामान्यांना लोकल मधून प्रवास करता येणार नाही. तेव्हा त्यांना नो एंट्री आसून फक्त अत्यावश्यक नागरिकांनाच प्रवास करता येणार आहे. तर दुपारी १२ ते ४ या वेळात सर्वसामान्य जनतेला लोकलचा प्रवास करता येणार आहे. तसेच रात्री शेवटची ९ वाजताच्या लोकलने सर्वांना प्रवास करता येणार.
सरकारच्या निर्णयाने रेल्वे प्रवासी संघटनेचे महिला प्रवाशी नाराज…..
रेल्वे प्रवासी संघटनेच्या वंदना सोनावणे यांनी सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. “कार्यालयीन वेळेनुसार सुधारणा करा,फक्त सरकारी कर्मचारांचा विचार करू नका जरा प्राईवेट सेक्टरचाही विचार करा, त्यांची मोठी गोची करू नका अश्या स्पष्ट शब्दांतून त्यांनी सरकारवरनिशाणा साधला. तसेच रेल्वे प्रवासी संघटनेच्या लता अरगडे यांनी निर्णयाचे स्वागत केले पण “रेल्वेने योग्य नियोजन केले नाही”. असे मत ही व्यक्त केले.
पण, या सर्वात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकल संदर्भात केलेल्या या घोषणेमुळे मुंबईकरांसाठी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर अटी शर्थी सह लोकलमधे सर्व सामान्य जनतेला प्रवास करता येणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव