या २५ लाख ग्राहकांची माहिती झाली लीक

नवी दिल्ली, ३ फेब्रुवरी २०२१: आज मोबाईल आणि  इंटरनेट ने संपूर्ण जगाला जवळ आणलं आहे. आधी दळणवळणाला मोजक्या गोष्टी होत्या आणि ते अवघड ही होते. हळूहळू काळ बदलत गेला आणि आधुनिक तंत्रज्ञान वाढत गेले. आज घडीला मोबाईल व इंटरनेट ने तर प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्त्वाचे स्थान निर्माण केलं आहे.आधी 2जी नंतर 3जी,4जी आणि आता जग 5 जी च्या उंबरठ्यावर आहे.
प्रत्येक कंपनीने आपल्या ग्राहकांना समाधानी करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन आणले आहेत. पण, हे ग्राहक म्हणून तुमच्या साठी कितपत सुरक्षित आहेत. या बद्दल आजून ही प्रश्नच आहे. त्यातुनच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामधे २५ लाख ग्राहकांची माहिती लीक झाली आहे.
एयरटेलच्या युजर्सला मोठा धक्का बसला आहे. रेड रॅबिट टीम नावाच्या हॅकर ग्रुपने दावा केला आहे की जवळपास २५ लाख लोकांची एयरटेल युजर्सची माहिती ऑनलाईन लीक झाली आहे. ज्यामुळे युजर्स मधे खळबळ उडाली आहे. तर यावर एयरटेल ने लगेच उत्तर देत ग्रहाकांना आश्वासन दिले आहे.
या लीक मधे युजर्सचे पर्सनल डिटेल्स म्हणजेच आधार नंबर आणि पत्ता यासरख्या माहितीचा समावेश आहे. दरम्यान एयरटेल ने स्पष्टिकरण देत सांगितले की, “आम्ही युझर्सच्या प्रायवेसी बद्दल वचनबद्ध आहोत आणि कुठल्याही प्रकारची माहिती लीक झालेली नाही.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा