लोणी देवकर च्या ग्रामपंचायत सरपंच पदी कालिदास देवकर,उपसरपंच पदी मंदाकिनी थोरात

इंदापूर ९ फेब्रुवारी २०२१ : इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची निवड आज करण्यात आली. विद्यार्थी गाणे आरक्षित जागी ग्रामपंचायत सरपंच निवड करण्यात आली. लोणी देवकर येथील ग्रामपंचायत सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने कालिदास देवकर यांनी एकमेव अर्ज दाखल केल्याने त्यांची सरपंच म्हणून निवड करण्यात आली. मंदाकिनी थोरात यांची उपसरपंच निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संगीता राखुंडे, शालन, थोरवे उज्वला घाडगे आणि भारत गायकवाड आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
कालिदास देवकर यांच्या वेताळ बाबा पॅनल ने बहुमत गाठल्याने देवकर यांचा सरपंच पदाचा मार्ग मोकळा झाला होता. सरपंच पदी नियुक्ती झाल्यानंतर देवकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नवनिर्वाचित सरपंच कालिदास देवकर आणि सर्व सदस्यांचा सत्कार केला. यावेळी गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे नवनियुक्त सरपंच कालिदास देवकर यांनी न्युज अनकट शी बोलताना सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी : निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा