आय कॉलेज मधील विद्यार्थ्यांसाठी हर्षवर्धन पाटील यांचे अभिभाषण

इंदापूर, १५ फेब्रुवरी २०२१: लॉकडाऊन नंतर तब्बल अकरा महिन्यांनी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील महाविद्यालय सुरू होण्याच्या या पहिल्याच दिवसी आज दि. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी स. ८ वा.  संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्राचार्य डॉ संजय चाकणे, महाविद्यालयातील प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कोरोना महामारीचे झालेले दुष्परिणाम सांगून सकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी ठेवण्यास सांगितले, वाचाल तर प्रगती होईलसे सांगून अभ्यासाचे, वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. उत्तम आरोग्य राखण्यासाठी नियमित व्यायाम आणि खेळ खेळले पाहिजेत. शिक्षणाने व्यक्ती समृद्ध बनतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेतले पाहिजे, असे मार्गदर्शन केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयात चालविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती सांगितली.

यावेळी उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, विज्ञान शाखा प्रमुख डॉ शिवाजी वीर, कला शाखा प्रमुख डॉ भिमाजी भोर, वाणिज्य शाखा प्रमुख डॉ सदाशिव उंबरदंड महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट डॉ. बाळासाहेब काळे यांनी केले तर आभार डॉ भिमाजी भोर यांनी मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा