रायगड, १८ फेब्रुवरी २०२१: उद्या शिवजयंती आहे. त्याकारणाने राज्य भरातून केले रायगडावर अनेक शिव भक्त महाराजांच्या दर्शनासाठी येत आसतात. मात्र सध्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून सरकार याची खबरदारी घेत उचित पावले टाकत आहे. त्यामुळे शिवजयंती निमित्त किल्ल्यावर गर्दी होऊ नये म्हणून मोजक्याच लोकांना परवानगी देण्यात आली होती. यामुळे राज्यभरातील शिवभक्त नाराज झाले होते तर मराठा समाज देखील बॅनर बाजी करत सरकारचा विरोध करत होता.
अश्यातच शिव भक्तांसाठी खुशखबर समोर आली आहे. शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर २ दिवस निशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. या दोन दिवसांत रायगडावर २४ तास प्रवेश दिला जाणार आहे. याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुरातत्व विभागाकडे मागणी केली होती. त्यानंतर अवघ्या २४ तासात पुरातत्व विभागानं मान्यता दिली. एरवी किल्ल्यावर सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पर्यटकांना परवानगी असते.
सरकारनं अखेर नवी नियमावली जारी करून शिवजयंतीला आता १०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. राज्य शासनाच्या गृहविभागाने हे नवीन परिपत्रक जारी केले आहे. तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे, असं त्यात म्हटलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे