पुण्याजवळ भूकंपाचे धक्के, रिक्टर स्केल वर तीव्रता ३.३

3
पुणे, १८ फेब्रुवरी २०२१: नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, गुरुवारी सकाळी महाराष्ट्रात पुण्याजवळ रिक्टर स्केल वर ३.३ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचे केंद्रबिंदू पुणे, दक्षिण-नैऋत्य (एसएसडब्ल्यू) कडे ९१  किलोमीटर अंतरावर होते.  भूकंपाची वेळ पहाटे ५.२९ वाजता पृष्ठभागापासून ६ किलोमीटरच्या खोलीवर नोंदवण्यात आली. मात्र यामुळे कोणतीही हानी झालेली नाही.
यापूर्वीही राज्यात हिंगोली मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.  नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार रिक्टर स्केलवर भूकंपाचे मापन ३.२ होते.  भूकंपातून कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नव्हते.  रात्री १२.४१ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले होते.
शुक्रवारी उत्तर भारतात भूकंपाचे धक्के
तसेच नुकतेच १३ तारखेला शुक्रवारी उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले.   या दिवशी रात्री १०.३० वाजता दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचा धक्का बसला होता. भूकंपाचा परिणाम हरियाणा, राजस्थान, जम्मू-काश्मीरमध्येही दिसून आला. भूकंपाचे केंद्रबिंदू ताजिकिस्तान येथे होते, जेथे भूकंप रिश्टर स्केलवर ६.३ तीव्रतेचा होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे