नवी दिल्ली, १९ फेब्रुवरी २०२१: भारत आणि चीनमधील लडाख सीमेवर सैन्य मागे हटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुरुवारी दोन्ही देशांमध्ये या प्रक्रियेची चौथी फेरीही सुरू झाली आहे. करारानंतर दोन्ही देश आपले सैनिक, शस्त्रे आणि टँक मागे घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, युद्ध बंदीच्या या टप्प्यात सैन्याला रेजांग ला आणि रिचिन ला येथून माघार घ्यावी लागेल. चीनी सैन्य वेगाने पँगोंग तलावाच्या दक्षिणेकडील भागातून मागे हटत आहे आणि त्यांनी येथे बांधलेल्या वास्तूही मागे घेत आहेत.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हा वाद सुरू झाल्यानंतर या महिन्यात दोन्ही देशांमध्ये करार झाला आहे. ज्यानंतर दोन्ही देशांच्या सैन्याने आपले सैनिक मागे घेण्यास सुरवात केली आहे. पँगोंग लेकवरील या प्रक्रियेचा पहिला टप्पा २४ ते ४८ तासांत पूर्ण होईल, त्यानंतर दोन्ही सैन्य याची पडताळणी करतील.
कराराच्या अनुषंगाने हे दोन्ही देश सत्यापन कधी करतील आणि त्यानंतर कमांडर स्तरावरील चर्चेची दहावी फेरी दोन्ही देशांमध्ये सुरू होऊ शकेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते.
विशेष म्हणजे भारत आणि चीन यांच्यात झालेल्या कराराच्या अनुषंगाने आता चीन लडाखच्या पँगोंग तलावातील फिंगर ८ वर परत जाईल. तर भारत फिंगर ३ वर पुन्हा जाईल. यावेळी, दोन्ही देशांनी आपली संपूर्ण सैन्य माघार घेईपर्यंत, पँगोंग लेकच्या क्षेत्रात पेट्रोलिंगला प्रतिबंधित असेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे