भाजप युवा महिला नेत्याच्या गाडीत सापडले कोकेन, केले अटक

कोलकत्ता, २० फेब्रुवरी २०२१: भाजपच्या युवा नेत्या पामेला गोस्वामी हिला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली.  ती आपल्या गाडीच्या आत कोकेन घेऊन जात होती.  न्यू अलीपूर भागातील एनआर एव्हेन्यू येथून पोलिसांनी तिचा मित्र प्रबीर कुमार डे यांना अटक केली.
 भाजपा युवा मोर्चाची पर्यवेक्षक आणि हुगळी जिल्ह्याची सरचिटणीस पामेला गोस्वामी हिला कोलकाताच्या न्यू अलीपूर येथून लाखो रुपयांच्या कोकेनसह अटक करण्यात आली. तिच्या गाडीत मोठ्या प्रमाणात अवैध ड्रग्स सापडली.  या भाजप नेतीला न्यू अलीपूर येथून अटक करण्यात आली.
 पामेलाच्या अमली पदार्थांबद्दल पोलिसांना आधीच माहिती होती.  तिचे निकटवर्तीय आणि भाजप नेते प्रबीर कुमार डे यांनाही अटक करण्यात आली होती.
 तपासणी दरम्यान न्यू अलिपूरमधील रस्त्यावर पोलिसांनी तीची गाडी थांबविली व शोध घेतला असता पामेलाच्या बॅग व कारमधून १०० ग्रॅम कोकेन जप्त केले.
 पकडलेल्या कोकेनची किंमत बाजारात सुमारे लाखो रुपये आहे.  तीच्यासमवेत  एक केंद्रीय सुरुक्षा दलातील सैनिकही होता.  पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा