मुंबई : PMC बँके घोटाळ्याप्रकरणी पीएमसी बँकेचे माजी संचालक आणि भाजपचे माजी आमदार तारा सिंग यांचा मुलगा रजनीत सिंग यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.
मुंबई पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात ३ HDIL चे संचालक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली होती. या संचालकांची ३ हजार ५०० कोटींची मालमत्ता गोठवण्यात आली होती.
MC बँकेचे अधिकारी आणि HDIL च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरव्यवहारामुळे ४ हजार ३५५ कोटींचं नुकसान झालं, असं आढळून आलं होतं.
PMC बँकेचे माजी संचालक जॉय थॉमस आणि अध्यक्ष वरियम सिंग आणि HDIL चे राकेश वाधवान, सारंग वाधवान यांची FIR मध्ये नावे होती. पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने ६ महिन्यांसाठी निर्बंध घातले. या बँकेच्या खातेदारांची खाती गोठवण्यात आली. त्यानंतर या बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जसबीर सिंह मठ्ठा यांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेकडे हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.