धुळे, ५ मार्च २०२१: राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णाच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. त्यात ही राज्यातील विविध जिल्हातील भागात परिस्थिती हाताळतांना सरकारचा कस लागत आहे. कारण तिथे परिस्थिती हाताबाहेर गेल्याची पहायला मिळत आहे. त्यामुळे आता राज्यात ज्या भागात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. तिथे अनिश्चित काळासाठी संचार बंदी करण्यात आली आहे.
धुळे जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या वतीने रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी २०७ रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवा वगळता सर्वआस्थापणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
नियमांचेउल्लंघन करण्यार्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गुरुवारपासून हा निर्णय घेण्यात आला आहे. तर ही संचारबंदी अनिश्चित काळासाठी करण्यात आली आहे. कोरोना विषाणूची साखळी या संचारबंदी मुळे तुटेल आणि परिस्थिती नियंत्रणात येईल आशी तेथील प्रशासनाला अपेक्षा आहे.
तर या संचारबंदी चे नागरिकांनी जबाबदारीने पालन करण्याचे आवहान तेथील प्रशासनाने केली आहे. तर रात्रीच्या वेळी भटकंती करणार्या टोळक्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष्य आसणार आहे. धुळ्याबरोबरोच राज्यातील अनेक जिल्हांमधे परिस्थिती आशीच निर्माण झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखील जाधव