झारखंड, ७ मार्च २०२१: झारखंडच्या रामगड जिल्ह्यातून एक खूप हैराण करणारी घटना घडली आहे. इथे आपल्या मुलीच्या एका वाईट कृतीमुळे वडिलांनी ती जिवंत असताना तिचा अंतिम संस्कार केला. श्मशान घाटावर अंतविधि करत बरोबर मुलीचा पुतळा बनवून चिता रचली गेली. त्या नंतर त्या चितेला मुखअग्नी देऊन पंचतत्त्वात विलिन केले गेले. या अंतिम संस्कारावेळी वडिलच नाही तर तिचे संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित होते. हे प्रकरण प्रेम संबंधाशी जोडले गेले आहे.जिथे मुलीने घरातून पळून जाऊन आपल्याच चुलत भावाबरोबर लग्न केलं ज्यानंतर हि घटना घडली.
रामगड जिल्यातील रजरप्पा ठाण्याच्या चितरपुर प्रखंड मध्ये ही घटना घडली ज्यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. इकडे आपल्या मुलीने असे केले म्हणून गावात बदनामी झालेल्या तिच्या घरच्यांनी तिचे जिंवत आसताना अंतिम संस्कार केले. या पुर्ण घटनाक्रमाची चर्चा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. मुलीने पळून जाऊन चुलत भावाबरोबर लग्न केले पण तिचे लग्न ठरले होते आणि बुधवारी टिळा लावण्याचा कार्यक्रम होता.
मिळालेल्या माहितीनुसार मुलगी आपल्या प्रेमी बरोबर अर्थात चुलत भावाबरोबर २८ फेब्रुवारी रोजी घरातून पळून गेली होती. तेव्हा या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी रजरप्पा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत मुलगी क्रांती कुमारी ला जबरदस्तीने घरातून पळवून घेऊन गेल्याचा आरोप भावावर लावला होता.
पोलिसांनी शोध मोहिम हाती घेतले आणि बर्याच दिवसांनंतर व मेहनती ने दोघांना शोधण्यात पोलिसांना यश आले. ठाण्यात बरदोघांना बऱ्याचदा समजवण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकच नाही तर पोलिसांनी ही प्रयत्न केला पण मुलगी आपल्या प्रेमी बरोबरच राहण्याची अडून राहीली. ज्या नंतर नाराज झालेल्या वडिलांनी तिचा जिवंत पणी अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला.
“कुटुंबासाठी आता ती मेली”असे मत कुटुंबीयांचे आहे.”मुलीने कुटुंबाला आयुष्य भरासाठी कलंक लावला,तिच्या या कृत्यामुळे आयुष्यभर बदनामीचे चटके सहन करावे लागणार” म्हणून तिला मेलेली मानून तिचे अंतिम संस्कार केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. गावातील वातावरण सध्या भरपूर तणावपूर्ण आहे तर तरुणी बरोबर घरच्यांनी सर्वं नाते तोडले आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी ही आपलं मत ठेवत कुटुंबीयांना धिराने घेण्याचे सांगितले आहेत. रजरप्पा पोलीस ठाण्यातील विविध कुमार यांनी सांगितले की तरुण तरुणी दोघेही सज्ञान आहेत. ज्यामुळे त्यांच्यावर कुणीही कुठल्याही प्रकारचा दबाव टाकू शकत नाही. तसेच दोघांनी स्वताच्या आपसी सहमतीने हे लग्न केलं आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी हे प्रकरण धैर्याने घेणं गरजेचं आहे असे ते म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव