बंगाल मधे लस घेतलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यू

बंगाल १० मार्च २०२१; पश्चिम बंगालच्या धुपगुरी भागात कोविशिल्ड लस घेतल्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. यानंतर त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. एका अधिकार्याने सांगितले की, जलपाईगुडी येथील व्यावसायिकाचे ६४ वर्षीय कृष्णा दत्ता यांचे स्थानिक रुग्णालयात निधन झाले आणि तेथे त्यांना दम लागल्याच्या तक्रारीनंतर दाखल करण्यात आले होते.सोमवारी त्यांना लसीकरण करण्यात आले व रात्री श्वास घ्यायला त्रास होऊ लागला,डॉक्टरांनी त्यांना थोड्याच वेळानंतर मृत घोषित केले.त्यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचा आरोप करत त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली.
अधिकार्याने सांगितले की, मृतदेह पोस्टमार्टमसाठी जलपाईगुडी राज्य सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या अधिकार्याने सांगितले की, मंगळवारी एकूण १,६०,४३५ लोकांना कोविड विरोधी लस देण्यात आली आहे. ते म्हणाले की बंगालमध्ये लसीकरणानंतर वाईट परिणामांचे कोणतेही प्रकरण समोर आले नाही. मंगळवारपर्यंत राज्यात १८.४३ लाख लोकांना लस देण्यात आल्या आहेत.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये असे सांगितले गेले आहे की बंगालमध्ये मंगळवारी कोरोना विषाणूची १८८ नवीन प्रकरणे आली आणि एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर, एकूण रुग्णांची संख्या ५,७७,०२६ वर पोहोचली आहे तर कोरोना विषाणूमुळे १०,२८१ लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात, ३,१४४लोकांवर उपचार सुरू आहेत तर ५,६३,६०१  लोक संसर्गापासून मुक्त झाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा