पुणे, १२ मार्च २०२१; “आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज्” समाजातील प्रत्येक घटकांचा विचार करत आपले योगदान देण्यात नेहमीच अग्रेसर असते. परिस्थिती आणि गरजेनुसार विविध क्षेत्रात कार्यरत असणारी हि कंपनी पुन्हा आपले दायित्व सिद्ध करत ग्रामीण भागात आपले प्रकल्प राबवत आहे.
मौजे मोटेवाडी ग्रामपंचायत ता.माळशिरस जि.सोलापूर येथे सौर ऊर्जा ,सार्वजनिक पेयजल योजनेसाठी कृषी सोलर पंप तसेच शाळेत इ-लर्निंग,डिजिटल ग्रामपंचायत ‘आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज् ‘करणार आहे.ता.खटाव जि.सातारा येथील मौजे मासुर्णे गावात ग्रामपंचायतीसाठी सोलर व बायोगॅस विदयुत निर्मिती या कंपनीच्या वतीने करण्यात येणार आहे.
‘आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज्’ सतत प्रत्येक काळात परिस्थिती नुसार आपले योगदान देण्याचे काम कर्तव्यपुरक जाणीवेने पुर्ण करते आहे .या आधी कोरोना परिस्थितीशी दोन हात करण्यार्या रुग्णालयांना अँम्बुलँस,गरीब गरजू शेतकर्यांना सौर पंपाचे वाटप,ग्रामीण भागातील शाळांमध्ये सोलर पॅनल आणि इ-लर्निंगगचे डिजिटलायझेशन करणार आहे.
या योजनांअंतर्गत ग्रामीण भागातील गरीब व गरजू शेतकऱ्यांना एक नवीन उभारी देण्याचा कंपनीचा हेतू आहे . ज्यामुळे या क्षेत्रातील अनेक गरजूंना एक स्त्रोत या निमित्ताने मिळेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी; निखिल जाधव.