रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगा ब्लॉक

36

मुंबई: विविध कामांसाठी आज (१७ नोव्हेंबर) रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे-मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग, हार्बरवर पनवेल ते वाशी दोन्ही मार्गावर व पश्चिम रेल्वेवर मरिन लाइन्स ते माहीम डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक असेल.
कल्याण ते ठाणे अप् जलद मार्ग या लोकांमुळे प्रभावित होणार आहे. सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. कल्याण ते ठाणे मार्गादरम्यान अप जलद लोकल धिम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. त्यानंतर ठाणे ते सीएसएमटीपर्यंत पुन्हा जलद मार्गावर धावतील. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा स्थानकात जलद लोकल थांबतील. रत्नागिरी ते दादर पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंत चालवण्यात येईल. याच स्थानकातून रत्नागिरीसाठी गाडी सुटेल.
कल्याण ते ठाणे मार्गादरम्यान अप जलद लोकल धिम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. त्यानंतर ठाणे ते सीएसएमटीपर्यंत पुन्हा जलद मार्गावर धावतील. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा स्थानकात जलद लोकल थांबतील. रत्नागिरी ते दादर पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंत चालवण्यात येईल. याच स्थानकातून रत्नागिरीसाठी गाडी सुटेल.
पनवेल ते सीएसएमटी सकाळी ११.०६ ते सायं. ४ व सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर दरम्यान स. १०.०३ ते दु. ३.१६ पर्यंत लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतील. ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर ठाणे ते वाशी, नेरुळ या ट्रान्स हार्बरवर लोकल धावतील. नेरुळ, बेलापूर ते खारकोपर दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहतील.