सोनाक्षी नंतर तापाशी झाली सोशल मीडियावर ट्रोल

अच्युत यांच्या मदतीसाठी अभिनेत्री तापसी पन्नूने शोमध्ये हजर होती. मात्र तापसीने अच्युत यांना फारशी मदत न केल्याने चाहते नाराज झाले असल्याचे पाहायला मिळते. ज्याप्रमाणे सोनाक्षीला सोप्या प्रश्नाचे उत्तर देता आले नव्हते त्याच प्रमाणे तापसीने देखील एका सोप्या प्रश्नासाठी लाइफलाईनचा वापर केला आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला रामायणावर आधारीत विचारलेल्या सोप्या प्रश्नाचे उत्तर देता आले नव्हेत. त्यामुळे सोनाक्षीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. आता अभिनेत्री तापसी पन्नूला ‘कुंभमेळ्यातील कुंभ या शब्दाचा अर्थ काय?’ हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे योग्य उत्तर होते ‘मडकं’ (घडा) होते. मात्र तापसी या प्रश्नाते उत्तर देण्यात अयशस्वी झाली. त्यानंतर तापसीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा