कुल्फी कबाब

साहित्य: ४ चिकन ड्रम स्टिक्स, १ चमचा आले-लसूण वाटलेले, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा मिरपूड, अर्धा चमचा लिंबूरस, मीठ. तसेच आवरणासाठी पाव कप किसलेले चीज, २ चमचे मावा, ४ हिरव्या मिरच्या, पाव चमचा धने पूड, पाव कप काजू पूड.
कृती: चिकन धुऊन त्याला वाटलेले आले-लसूण, चाट मसाला, मिरपूड, लिंबूरस आणि मीठ लावून तासभर ठेवा.आता चीज, मावा, हिरव्या मिरच्या, चाट मसाला, धने पूड आणि काजू पूड एकत्र करून मिक्सरला वाटून घ्या.ते मिश्रण चिकनला लावून घ्या. यानंतर चिकन फॉइलमध्ये गुंडाळून २४० अंश सेल्सिअसला ३० मिनिटे बेक करून घ्या. सव्‍‌र्ह करताना केशर व पिस्त्याचे काप घाला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा