चीन मधून भारतात दाखल झाले ३६०० कंसंट्रेटर्स, आत्तापर्यंतची सर्वात मोठी खेप

नवी दिल्ली, १७ मे २०२१: रविवारी दुपारी ३६०० हून अधिक ऑक्सिजन कंसंट्रेटर्स चीनमधून दाखल झाली. देशातील आलेल्या कंसंट्रेटर्सची ही आतापर्यंतची सर्वात मोठी खेप आहे. त्याचबरोबर एवढ्या मोठ्या संख्येने कंसंट्रेटर्स देशात आज पर्यंत आले नाहीत. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं मृत्यू होत असल्यानं हे कोरोना रूग्णांच्या उपचारांमध्ये मदत करेल.

१०० टन आहे वजन

दिल्लीत एकत्र आणलेल्या एकूण ३६०० कंसंट्रेटरचं वजन १०० टनांपेक्षा जास्त आहे. चीनच्या बोईंग ७४७ ने त्यांना चीनच्या हांग्जो विमानतळावरून आणलं. हे जम्बो चार्टर विमान दुपार नंतर दिल्लीत दाखल झालं. बेलोर लॉजिस्टिक्सने ही खेप मागविली आहे. ही आयात मागणी त्वरित पूर्ण करण्यासाठी चीनी दूतावासांचीही मदत घेण्यात आली.

दिल्ली एनसीआरसह संपूर्ण देश कोरोना संकटात सापडला आहे. साथीच्या रोगामुळं देशात कंसंट्रेटर्स आणि इतर जीवनरक्षक उपकरणांची मागणी वाढलीय. दररोज तीन लाखाहून अधिक रुग्ण सापडत असल्यानं ऑक्सिजनचं संकट उद्भवलं आहे. ही साधनं चीनसह अनेक देशांकडून आयात केली जात आहेत. येत्या काही दिवसांत चीनकडून अशा आणखी खेप भारतात येतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा