मुंबई, २३ जून २०२१: राकेश झुंझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या कम्यूनिकेशंस स्टॉक टाटा कम्युनिकेशन्सने गेल्या एका महिन्यात सुमारे २० टक्के परतावा दिला आहे. विशेष बाब म्हणजे मागील २० सत्रामध्ये ५ टक्क्यांहून अधिक करेक्शननंतर हा २० टक्के परतावा मिळाला.
शेअर बाजारातील दिग्गजांचे म्हणणे आहे की ही करेक्शन केवळ प्रॉफिट बुकिंगसाठी आहे. या शेअर्समध्ये पुढे आणखीन प्रॉफिट दिसून येत आहे आणि पुढील ६-९ महिन्यांत १८०० रुपयांच्या पातळीला स्पर्श करू शकतो.
जीसीएल सिक्युरिटीजचे रवी सिंघल म्हणाले की, टाटा कम्युनिकेशनला टीसीएस आणि भारती एअरटेल यांच्यात मेड इन इंडिया, ५ जी रोल आउट करारामुळे फायदा होईल. याचे कारण असे आहे की, टाटा कम्युनिकेशन्स त्यांच्या कम्यूनिकेशंस नेटवर्क नेटवर्कची देखभाल करत आहेत. याशिवाय बीएसएनएलच्या लँड बँक विक्रीच्या योजनेतून या कंपनीला भारत सरकारकडून सुमारे १० हजार कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे.
ट्रेडइट इन्वेस्टमेंट चे अॅडव्हायझर्स संदीप मट्टा यांचे म्हणणे आहे की टाटा कम्युनिकेशन्स सुमारे २०० देशांमधील ७००० हून अधिक ग्राहकांना सेवा देतात. कंपनीच्या व्यवसायात पुढील वाढ होण्याची प्रचंड क्षमता आहे. या काउंटरमध्ये येणारी कोणतीही घसरण ही खरेदीची संधी मानली जावी असे मत संदीप मट्टा यांचे मत आहे
दुसरीकडे, रवी सिंघल सांगतात की हा स्टॉक सध्याच्या किंमतीवरही खरेदी करता येईल. यासाठी ११०० रुपयांचे स्टॉप लॉस ठेवा. पुढील ६-९ महिन्यांत या स्टॉकमध्ये १६७०-१८०० ची पातळी दिसून येईल. शॉर्ट टर्म ट्रेडर्स साठी संदीप मट्टा यांचा १२८९ रुपयांच्या स्टॉप लॉससह या स्टॉकवर खरेदीचा सल्ला आहे, ज्याचे टारगेट १३३५ रुपये आहे. महत्त्वाचे म्हणजे टाटा कम्युनिकेशन्समधील राकेश झुनझुनवाला यांचा हिस्सा २९,५०,६८७ शेअर्स म्हणजेच १.०४ टक्के आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे