जुलैपासून मुलांना मिळणार कोरोनाची लस! ही कंपनी करणार मंजुरीसाठी अर्ज

नवी दिल्ली, २८ जून २०२१: कोरोना लसीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी जायडस कॅडिला या देशी लस कंपनीशी संबंधित आहे. असं सांगितलं जात आहे की, या लसीची चाचणी जवळजवळ पूर्ण झालीय आणि पुढील काही महिन्यांत ती लहान मुलांसाठी सुरू केली जाऊ शकते. असं कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांनी सांगितलंय.


एनके अरोरा म्हणाले की, जायडस कॅडिलाच्या कोरोना लसीची चाचणी जवळजवळ पूर्ण झालीय. आता जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये, ती १२ ते १८ वर्षांच्या मुलांना लागू केली जाऊ शकते. सध्या देशात कोरोनाची लस १८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जातेय.

तिसऱ्या लाटेच्या आधी केंद्र सरकारला अधिकाधिक लोकांना कोरोना लसीकरण करायचं आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यासाठी लसींची मात्र देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असनं महत्त्वाचं आहे. चाचणीचे परिणाम चांगले झाल्यानंतर जायडस कॅडिलाला लवकरच मंजुरी मिळाली तर यामुळं थोडा दिलासा मिळेल.


कंपनी लवकरच मंजुरीसाठी अर्ज करू शकते


आता १८ जून २०२१ रोजी, जायडस कॅडिला पुढील ७ ते १० दिवसात झायकोव्ह-डी कोरोना लसीच्या तातडीच्या वापरासाठी मंजूरीसाठी अर्ज करू शकेल असा अहवाल आलाय. सध्या भारतात आपत्कालीन वापरासाठी तीन कोरोना लस मंजूर झाल्या आहेत. यात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक यांचा समावेश आहे. तिसऱ्या लाटेत कोरोनाचा अधिक परिणाम मुलांवर दिसून येणार आहे. अशा परिस्थितीत, जर १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना जायडस कॅडिलाची कोरोना लस लागण्यास सुरुवात झाली तर स्थिती थोडीफार नियंत्रणात असेल.


जायडस कॅडिला लसमध्ये तीन डोस


जायडस कॅडिलाची ही लस जगातील इतर लसींपेक्षा खूप वेगळी आहे. वास्तविक, कोविशिल्ड, स्पुतनिक, कोव्हॅक्सिन इत्यादी बहुतेक लसांच्या केवळ दोन डोस लागू केल्या जातात. परंतु दोन नव्हे, तर जायडस या लसीचे तीन डोस लागू केले जातील.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा