भारतात आता मिळणार मॉडर्ना’ची लस, सिप्ला’ला दिली डीसीजीआय’नं मंजुरी

मुंबई, ३० जून २०२१: मॉडर्ना या अमेरिकन कंपनीची कोरोना लसचा आणीबाणी वापर करण्यास डीसीजीआय’नं मान्यता दिलीय. सिप्ला आता ही लस भारतात आयात करू शकेल. सूत्रांनी याची पुष्टी केलीय.

कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक व्ही. नंतर मॉडर्ना ही चौथी लस आहे जिला भारतानं मान्यता दिलीय. मुंबई येथील फार्मा कंपनी सिप्ला’नंही मॉडर्ना लसीच्या आयात व बाजाराच्या अधिकृततेस मान्यता देण्याबाबत मागणी केली होती, यानंतर डीसीजीआय’नं त्यास मान्यता दिलीय. डीसीजीआय’नं १ जून रोजीच परदेशी लसींच्या नियमांमध्ये शिथिलता आणली होती. डीसीजीआय’नं सांगितलं होतं की जर अमेरिका, युरोप, यूके, जपान किंवा डब्ल्यूएचओकडून लस मंजूर झाली असेल तर भारतात चाचण्या घेण्याची गरज नाही.

मॉडर्ना ला यापूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळालीय. डब्ल्यूएचओच्या मते, कोरोनाविरूद्ध मॉडर्नाची लस ९४.१% पर्यंत प्रभावी आहे. डब्ल्यूएचओ’चं म्हणणं आहे की मॉडर्ना लसीच्या पहिल्या डोसच्या १४ दिवसानंतर कोरोना होण्याचा धोका ९४.१% कमी झाला.
हे लक्षात घेण्यासारखं आहे की, मॉडर्ना व्यतिरिक्त फायझरची लस देखील लवकरच मंजूर केली जाऊ शकते. अलीकडेच फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोर्ला यांनी एका कार्यक्रमात सांगितलं की, भारतात फायझरच्या लसीला मान्यता देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच ही कंपनी भारत सरकारबरोबर झालेल्या करारास अंतिम रूप देऊ शकेल.

देशात कोरोनाचे प्रकार कमी झाले आहेत परंतु आता कोलोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. कोरोनाचे नवीन संकट टाळण्यासाठी सरकारनं लसीकरणावर जोर दिलाय. अशा परिस्थितीत, मॉडर्ना लस मंजूर झाल्यानं लसीकरण गती वाढविण्यात मदत होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा