सॉफ्टवेअर मधील बिघाडामुळे विक्रम लँडर अपयशी: इस्रो

इस्रो: अवघ्या भारतीयांचे लक्ष असणाऱ्या चंद्रयान २ मोहिमे मधील विक्रम लँडर हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार होते; परंतु काही तांत्रिक बिघाडामुळे विक्रम लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करू शकले नाही यामुळे करोडो भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. इस्रो चंद्रयान २ वर गेली नऊ ते दहा वर्षापासून काम करत होती व अचानक झालेल्या या घटनेमुळे सर्व शास्त्रज्ञांचे ही मन दुखावले गेले होते.
आत्तापर्यंत इस्रोने लेंडर सोबत नक्की काय झाले असेल याच्या पूर्ण शक्यतांची तपासणी केली होती. अनेक तज्ञांनी आपली वेगवेगळी मते मांडली होती. परंतु आज इस्रोने नक्की काय झाले होते याचा खुलासा केला आहे. इस्रोने अधिकृतरित्या सांगितले आहे की, सॉफ्टवेअर मधील खराबी मुळे विक्रम स्प्लेंडर च्या लँडिंग प्रोसेसचा शेवटचा क्षणांमध्ये संपर्क तुटला गेला. त्यामुळे विक्रम लेंडर हार्ड लँड झाले. विक्रम लँडर जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागापासून तीनशे ते पाचशे मीटर उंचीवर होते तेव्हा सॉफ्टवेअरने अचानक काम करणे बंद केल्यामुळे हा सर्व प्रकार घडला. त्यानंतर लँडर सोबत कोणताही संपर्क झाला नाही. लैंडिंग नंतर तब्बल बारा दिवस इस्रोने लेंडर सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला यामध्ये नासाने ही सहाय्य केले होते: परंतु दोन्हींच्या प्रयत्नांना अपयश आले होते. चंद्रयान २ इस्रो साठी एक महत्वकांशी योजना होती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा