नवी दिल्ली, ६ जुलै २०२१: राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये पुन्हा एकदा भूकंप झालाय. सोमवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.७ होती. या भूकंपाचं केंद्रबिंदू हरियाणाच्या झज्जरमध्ये होतं. भूकंपामुळे कोणतंही मोठं नुकसान झालं नाही.
दिल्ली आणि दिल्लीच्या आसपासच्या भागात झालेल्या भूकंपामुळं बरेच लोक घाबरले. लोक इमारतीतून बाहेर पडताना दिसले. दिल्ली-एनसीआरमध्ये बर्याच दिवसांपासून भूकंप येत आहेत. तथापि, ही दिलासादायक बाब आहे की येणाऱ्या बहुतेक भूकंपांची तीव्रता खूपच कमी असते, त्यामुळं कोणतंही मोठं नुकसान झालं नाही.
मात्र, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. दिल्ली-एनसीआरशिवाय राजस्थान, जम्मू-काश्मीर, हिमाचल इत्यादी भागातील फेब्रुवारीच्या मध्यभागी झालेल्या भूकंपाच्या धक्क्यानं हादरले होते. त्यावेळी तीव्रता ६.३ रिश्टर स्केलवर मोजली गेली आणि त्याचा केंद्रबिंदू ताजिकिस्तान होता.
भूकंप झाल्यास काय करावे आणि काय करू नये?
जेव्हा आपल्याला भूकंपाचे हादरे जाणवण्यास सुरुवात होते तेव्हा सर्व प्रथम घाबरू नका. जर तुम्ही एका इमारतीत असाल तर तिथून लवकर बाहेर पडा व मोकळ्या मैदानात उभे रहा. इमारतीतून खाली उतरताना लिफ्टनं अजिबात जाऊ नका. भूकंप दरम्यान हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्याच वेळी, इमारतीतून खाली जाणे शक्य नसल्यास जवळच्या टेबल, उंच चौकट किंवा पलंगाखाली लपा.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे