अ.नगर: नगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीम हुंडेकरी यांचे आज (सोमवारी) सकाळी राहत्या घराच्या जवळून अपहरण करण्यात आले. सकाळच्या वेळी चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांना लाल रंगाच्या गाडीत घालून पळून नेले. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पहाटे करीम हुंडेकरी हे नमाज पठन करण्यासाठी घराबाहेर पडलेले होते परंतु मशिदीत पोहोचण्यापूर्वीच चार ते पाच जणांच्या टोळक्याने पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना एका गाडीत घातले. हुंडेकरी यांनी सुटका करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अपहरणकर्त्यांच्या तोंडाला मास्क बांधले होते. असे प्रत्यक्षदर्शी असलेल्या स्थानिक महिलांचे म्हणणे आहे.
या घटनेबाबत पोलिसांना एका संशयिताची माहिती मिळाली असून अपहरणकर्त्यांच्या माहिती काढून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.