कोलंबो, २९ जुलै २०२१: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी -२० सामना काल कोलंबोमध्ये खेळला गेला, त्यात श्रीलंकेने विजय मिळवला. आता तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. थरारक सामन्यात भारत सुरुवातीपासूनच आघाडीवर दिसत होता, पण शेवटच्या ५ षटकांत श्रीलंकेने खेळ फिरवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने १३२-५ धावा केल्या. त्या बदल्यात श्रीलंकेने १९.४ षटकांत ६ विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चार खेळाडूंचे टी -20 आंतरराष्ट्रीय पदार्पण काल भारतकडून झाले. यात देवदत्त पाडीक्कल, नितीश राणा, ऋतुराज गायकवाड, चेतन साकारिया यांचा समावेश आहे. हा टी 20 मंगळवारी होणार होता. पण क्रुणाल पांड्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आणि त्यानंतर सामना पुढे ढकलण्यात आला.
भारताकडून शिखर धवन (४०) आणि देवदत्त पद्धिकल (२९) यांनी सर्वाधिक धावा केल्या. तर श्रीलंकेकडून धनंजय डी सिल्वा (४०) आणि मिनोद भानुका (३६) यांनी सर्वाधिक धावा केल्या. धनंजय डी सिल्वाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. रविवारी पहिल्या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने श्रीलंकेला ३८ धावांनी पराभूत करून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
गायकवाडच्या रुपाने भारताने सातव्या षटकात पहिला विकेट गमावला. त्यानंतर शिखर धवन १३ व्या षटकात बाद झाला. मग हळूहळू भारत १३२ च्या आकड्यावर पोहोचला. जी मोठी धावसंख्या नव्हती. भारताकडून ऋतुराज गायकवाडने २१, शिखर धवनने ४०, देवदत्त पदीकल २९, संजू सॅमसनने ७, नितीश राणाने ९, भुवनेश्वर कुमारने १३ आणि नवदीप सैनीने १ धावा केल्या.
श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडो ११, मिनोद भानुका ३६, सदीरा समरविक्रमा ८, कर्णधार दासुन शनाका ३, नंजय डी सिल्वा ४०(नाबाद), वनिंदू हसरंगा १५, रमेश मेंडिस २, चमिका करुणरत्ने १२ (नाबाद) बाद झाले.
भारताकडून भुवनेश्वर कुमार, चेतन साकारिया, वरुण चक्रवर्ती, राहुल चहरने १-१ आणि कुलदीप यादवने २ गडी बाद केले. श्रीलंकेकडून दुशमंथा चामिरा, वनिंदू हसरंगा, दासुन शनाका यांना १-१ तर अकिला धनंजयाला दोन विकेट मिळाल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे