टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मुष्टियोद्धा लव्हलिना बोर्गोहेनची कांस्यपदकाला गवसणी

टोकियो, ५ ऑगस्ट २०२१: टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मुष्टियोद्धा लव्हलिना बोर्गोहेनने ६९ किलोग्राम गटात कांस्यपदक पटकावले आहे. आज उपांत्य फेरीत विश्वविजेत्या तुर्कीच्या  बुसेनाझ सुरमेनेलीकडून तिला पराभव पत्करावा लागला. यापूर्वी पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे  तर मीराबाई चानूने भारोत्तोलनात रौप्य पदकाची कमाई केली आहे.
मूळच्या आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील.असेलल्या लव्हलीनाचा जन्म २ ऑक्टोबर १९९७ रोजी झाला. तिचे वडील टिकेन हे छोटे व्यापारी आहेत आणि आपल्या  मुलीच्या महत्वाकांक्षेला पाठबळ देण्यासाठी त्यांना आर्थिक आघाडीवर संघर्ष करावा लागला.तिच्या जुळ्या बहिणी लिचा आणि लीमा यांच्या पावलावर पाऊल टाकत या आसामीं मुलीने  प्रथम किकबॉक्सिंग सुरू केले. जेव्हा ती तिचे पहिले प्रशिक्षक पदम बोरो यांना  भेटली तेव्हाच तिच्या आयुष्याला निश्चित कलाटणी मिळाली. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या शिलाँग आणि दिमापूर केंद्रांवर कार्यरत असणाऱ्या बोरो यांनी  तिला मुष्टियुद्ध खेळाची  ओळख करून दिली आणि तेव्हापासून लव्हलिनाने  मागे वळून पाहिले नाही. मुष्टियुद्ध खेळ तिला आवडू लागल्यानंतर लव्हलिना नेहमीच संधीच्या शोधात होती आणि काही महिन्यांतच ही  संधी तिचाकडे चालून आली.ज्या शाळेत ती शिकली होती त्या बारपथार मुलींच्या शाळेत भारतीय क्रीडा प्राधिकरणाने चाचण्या आयोजित केल्या होत्या , या  चाचण्यांमध्ये भाग घेत लव्हलिनाने आपले कौशल्य दाखवले. अशाप्रकारे  तिची अपवादात्मक क्रीडा प्रतिभा बोरोच्या लक्षात आली आणि  २०१२ पासून त्यांनी तिच्यावर मेहनत घेणे सुरु केले. एका महिलेला मुष्टियुद्ध खेळात असलेल्या  स्वारस्यावर प्रश्न विचारणाऱ्या समाजाशी ,शिखरावर पोहोचण्याच्या तिच्या या प्रवासात,तिने संघर्ष केला. पण यामुळे तिच्या आकांक्षांना धक्का बसला नाही परिणामी  २०१८ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकत तिला पहिले मोठे यश मिळाले. टोक्यो ऑलिम्पिक २०२० साठी पात्र ठरल्यानंतर ती आसामच्या इतिहासातील ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली महिला ठरली.
वैयक्तिक माहिती:
जन्मतारीख :   ०२ ऑक्टोबर १९९७
निवासस्थान :   गोलाघाट, आसाम
प्रशिक्षण स्थान : अस्सिसी , इटली
वैयक्तिक प्रशिक्षक: श्रीमती  संध्या गुरुंग
राष्ट्रीय प्रशिक्षक: मोहम्मद अली कमर
कामगिरी:
२०१८ आणि २०१९ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेती
२०१७ आणि २०२१ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेती
सरकारी मदत  :-
कोविड १९ मधून ती बरी झाल्यानंतर गुवाहाटीमध्ये एक महिन्याचे वैयक्तिक प्रशिक्षण शिबीर
उपयोगी  उपकरणांच्या खरेदीसाठी
कोविड १९ संसर्ग झाल्यानंतर तिचा  वैद्यकीय खर्च आणि डॉक्टरांचा सल्ला
टोक्यो ऑलिम्पिक, २०२० सुरू होण्यापूर्वी इटलीच्या अस्सिसी  येथे एका  महिन्याचे प्रशिक्षण शिबिर
आर्थिक मदत
टॉप्स        रु. ११,३०,३००
एसीटीसी    रु.  ७,००,२१५
एकूण       रु. १८,३०,५१५
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा