नवी दिल्ली, ६ ऑगस्ट २०२१ : कुस्तीपटू रवीकुमार दहिया याने आज टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल ५७ किलोच्या अंतिम फेरीत रशियाचा दोन वेळचा विश्वविजेता झौर उगुएवकडून ४-७ ने पराभूत होत रौप्य पदक जिंकले. कुस्तीपटू सुशील कुमार नंतर कुस्तीमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकणारा हा २३ वर्षीय रवीकुमार दुसरा पुरुष कुस्तीपटू ठरला. मीराबाई चानू, पी.व्ही. सिंधू, लवलिना बोर्गोहेन आणि पुरुष हॉकी संघाने पदके मिळवल्यानंतर हे भारताचे पाचवे पदक आहे.
रवी कुमार दहिया हा मूळचा हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील नहरी गावचा आहे. तो एका शेतकरी कुटुंबातून आला आहे आणि त्याचे वडील त्याच्या गावातील भातशेतीमध्ये काम करायचे. त्याने वयाच्या १० व्या वर्षी कुस्ती खेळायला सुरुवात केली. २०१७ मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान त्याला गुडघ्याला दुखापत झाली. यामुळे त्याला कोणतेही प्रायोजक नव्हते आणि दुखापतीपासून बरे होण्यासाठी त्याला त्याच्या हितचिंतकांवर अवलंबून रहावे लागले.
• वैयक्तिक माहिती:
जन्मतारीख: १२ डिसेंबर १९९७
निवास स्थान: निहारी, सोनीपत, हरियाणा
खेळ: कुस्ती
प्रशिक्षण तळ: SAI NRC सोनीपत/ छत्रसाल स्टेडियम
वैयक्तिक प्रशिक्षक: कमल मलिकोव
राष्ट्रीय प्रशिक्षक: जगमंदर सिंह
• कामगिरी:
जागतिक अजिंक्यपद – कांस्य
आशियाई अजिंक्यपद – २ सुवर्ण
अंडर -२३ जागतिक अजिंक्यपद – १ रौप्य पदक
जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा – रौप्य
आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद – सुवर्ण
• प्रमुख सरकारी उपाययोजना
• राष्ट्रीय शिबिरांमध्ये वैयक्तिक सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समावेश
• एसीटीसी द्वारे २०१७ ते २०२१ दरम्यान आशियाई अजिंक्यपद , वरिष्ठ जागतिक अजिंक्यपद , मॅटेओ पेलीकोन रँकिंग स्पर्धा, यासर डोगू आणि विश्वचषक स्पर्धेत सहभाग
• ऑलिम्पिक २०२० च्या तयारीसाठी वैयक्तिक सहाय्यक कर्मचाऱ्यांसह रशियामध्ये प्रशिक्षण शिबिर
• पोलंड ओपन 2020 मध्ये सहभागासाठी व्हिसा मदत
न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे