पवारांनी टाकली गुगली

दिल्ली: राज्यात सरकार स्थापण्याबाबत शरद पवार यांनी सोमवारी सायंकाळी १०, जनपथवर जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली. सुमारे पाऊण तास उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अ‍ॅन्टोनी हे उपस्थित होते.
शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अद्यापही स्पष्ट भूमिका घेतलेली नसतानाच, सत्तास्थापनेबाबत भाजपला  विचारा आणि सोनियांशी सत्तास्थापण्याच्या मुद्यावर चर्चाच झालेली नाही, अशी गुगली टाकणारी विधाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी केली. राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबत या भेटीत कोणतीही चर्चा झाली नाही. सोनियांशी दोन्ही काँग्रेसबाबत चर्चा झाली. त्यात शिवसेनेशी आघाडी करून सरकार स्थापण्याचा विषयच निघाला नाही, असे पवार यांनी बैठकीनंतर  स्पष्ट केले. काँग्रेस आघाडीतील छोटय़ा पक्षांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असेही पवार यांनी सांगितले. समाजवादी पक्ष, शेतकरी संघटना, जोगेंद्र कवाडे यांचा पक्ष, शेकापसह छोटय़ा पक्षांशी आमची निवडणुकीत आघाडी होती. या सर्वाना विश्वासात घेतले जाईल, असेही पवारांनी सूचित केले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा