उजनी जलाशयात सापडला ‘कटला’

81

पुणे : उजनी जलाशयात मासेमारी करत असताना बापू नगरे या मच्छीमाराला १७ किलो वजनाचा “कटला” जातीचा मासा सापडला. परिसरातील उजनी पाणलोट क्षेत्रात गोड्या पाण्यात एवढा मोठा सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. या माशाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
जाळ्यात सापडलेला १७ किलोचा मासा भिगवण येथील मच्छीमार्केटमध्ये विक्रीसाठी नेला असता २६० रुपये प्रति किलो दराप्रमाणे विकला जाऊन एक माशाचे ४ हजार ४४० रुपये त्यांना मिळाले. मच्छी मार्केटमध्ये हा मासा पुणे येथील व्यापाऱ्यांनी खरेदी केला.
यावर्षी उन्हाळ्यात उजनी जलाशयाचा पाणीसाठा ऐतिहासिक अशा वजा ५९ % पातळीवर गेला होता.