पुणे, २४ ऑगस्ट २०२१: गुगलने गुगल प्ले स्टोअरमधून ८ धोकादायक ॲप्स काढून टाकले आहेत. या ॲप्सच्या मदतीने हॅकर्स वापरकर्त्यांचा डेटा चोरून त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत असत. जर हे धोकादायक ॲप्स तुमच्या फोनमध्ये देखील असतील, तर तुम्ही ते त्वरित डिलीट करा.
ही सर्व ॲप्स क्रिप्टोकरन्सी मायनिंगशी संबंधित होती. क्रिप्टोकरन्सी मायनिंगची सध्या जगभरात खूप चर्चा होत आहे. यामुळे हॅकर्स याचा फायदा घेत अँड्रॉईड मोबाईल वापरकर्त्यांना लक्ष्य करत आहेत. या ॲप्सच्या मदतीने हॅकर्स वापरकर्त्याच्या फोनमध्ये मालवेअर आणि ऍडवेअर असलेले मेलेशियस ॲप्स इन्स्टॉल करतात.
सिक्युरिटी फर्म ट्रेंड मायक्रोच्या अहवालानुसार, ८ ॲप्स अँड्रॉइड वापरकर्त्यांना एड्स थांबवण्यासाठी, सबस्क्रिप्शन सेवेसाठी (दरमहा १,११५ रुपये) देण्यास सांगत असत. संशोधकाच्या मते, यापैकी दोन ॲप्स पेड(पैसे देऊन विकत घेणे) होते.
याचा अर्थ असा की वापरकर्त्यांना फोनवर इंस्टॉल करण्यासाठी पैसे द्यावे लागतील. सिक्युरिटी फर्मच्या अहवालानंतर गुगलने ही ॲप्स प्ले स्टोअरमधून काढून टाकली. येथे आम्ही तुम्हाला त्या धोकादायक ॲप्सबद्दल सांगत आहोत जे Google Play Store वरून काढून टाकण्यात आले आहेत.
प्ले स्टोअर वरून BitFunds – Crypto Cloud Mining, Bitcoin Miner – Cloud Mining, Bitcoin (BTC) – Pool Mining Cloud Wallet, Crypto Holic – Bitcoin Cloud Mining, Daily Bitcoin Rewards – Cloud Based Mining System, Bitcoin 2021, MineBit Pro – Crypto Cloud Mining & btc miner, Ethereum (ETH) – Pool Mining Cloud हे ॲप्स काढून टाकण्यात आले आहेत.
अशा परिस्थितीत जर तुम्ही वर नमूद केलेले कोणतेही ॲप्स वापरत असाल तर ते तुमच्या फोनवरून लगेच डिलीट करा. अन्यथा तुमच्या डेटाचा गैरवापर करून हॅकर्स तुमचे खूप नुकसान करू शकतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे