इराकमध्ये सरकार विरोधी आंदोलनात 34 ठार

इराक:इराकमध्ये गेल्या 3 दिवसांपासून सरकार विरोधी सुरु असलेल्या निदर्शनांमध्ये 34 जणांचा मृत्यू झाला आहे तर, दीड हजारांपेक्षा जास्त आंदोलक जखमी झाले आहेत.
  इराकचे पंतप्रधान आदिल अब्दुल महदी यांच्या कमकुवत सरकार विरोधात देशामध्ये आंदोलन पेटले आहे.
  बेरोजगारी, सरकारी सुविधांचा अभाव आणि भ्रष्टाचार सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावरुन इराकचे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
संचारबंदी  : देशाच्या दक्षिण भागातील अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांची सुरक्षा आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून निर्णय घेण्यात आले.
 संयुक्त राष्ट्राने सरकार आणि आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा