पुन्हा हादरले काबूल, विमानतळाजवळील निवासी भागात रॉकेट हल्ला

5
काबूल, ३० ऑगस्ट २०२१: अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या विमानतळाजवळ रविवारी पुन्हा एकदा स्फोट झाला आहे.  काबूल विमानतळाजवळील गुलाई भागात एका निवासी घरावर रॉकेट हल्ला झाला.  यानंतर आजूबाजूच्या भागात धूर उठताना दिसला.  या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे.
 तीन दिवसांपूर्वी राजधानी काबूल साखळी स्फोटांनी हादरले होते.  गुरुवारी काबूल विमानतळाजवळ मालिका स्फोट झाले, ज्यात १६९ अफगाण नागरिक आणि १३ अमेरिकन सैनिकांना आपला जीव गमवावा लागला.
 अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आणखी स्फोट होण्याची चिंता व्यक्त केली होती.  काबूल विमानतळाजवळ स्फोटानंतर गोंधळ उडाला आहे.  लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावत आहेत.  मात्र, हा स्फोट किती मोठा आहे हे अद्याप समजू शकले नाही, परंतु स्फोटामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
 सुरुवातीच्या फोटोंमध्ये स्फोटानंतर आजूबाजूला भरपूर धूर उठताना दिसत आहे.  अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी इशारा दिला की गुरुवारचा स्फोट हा शेवटचा नाही.  याशिवाय अनेक स्फोटही होऊ शकतात.  आदल्या दिवशी बायडेन म्हणाले होते की काबूल विमानतळाजवळ आणखी स्फोट होऊ शकतात.  पुढील २४ ते ३६ तासांच्या आत हा स्फोट होऊ शकतो असा दावाही त्यांनी केला होता.
 दुसरीकडे, इसिस-के ने गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.  यानंतर, अमेरिकेने स्फोटांना जबाबदार असणाऱ्यांना लवकरच शिक्षा देण्याविषयी बोलले होते.  स्फोटानंतर ४८ तासांच्या आत अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ला करत बदला घेतला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा