विकीर

आजच का तिची आठवण आली ?

बालाजी मंदिरातून बाहेर पडताना चिंचोळ्याश्या त्या गल्लीतून जाताना पार्क केलेल्या त्या सगळ्या बाईक वाल्यांचा राग येत होता .मित्राला बोलवलं होत त्याचा पण काही पत्ता नव्हता. मोबाईल काढून त्याला फोन लावतच होतो तर अजून एक जण बाईक वर आपल्या हिरोइन ला घेऊन नेमका मला आडवा आला ,नशीब नडला नाही, नाहीतर तिच्या समोरच वाजवली असती, मित्र लेट आल्याचा राग त्याच्या कानाखाली दिसला असता. तेवढ्यात आमचे मित्र आले. (इतकी वाट बघायला लावली त्याबदल्यात थोडा आदर दिलाय भावाला).
आल्या आल्या ह्याचा चेहरा “कधी पासून सिगरेट घेतलीच नाही यार ” असा दिसला, मीच बोल्लो मग, चल चहा घेवू .
चहाच्या टपरी वर पण चहा पिताना कान किटवणारे कमी नव्हते, फोन वर बोलता बोलता आज काल सगळेच आणखी पाच काम सहज करू शकतात; नाहीतर आधी, फोनच्या बाजूला बसून ,फोन कानाला लावून फोनवर बोलण हेच फार मोठ काम असायचं . आत्ताचा हिरो कान आणि खांद्याच्या मध्ये मोबाईल धरून एका हातात चहाचा ग्लास आणि दुसऱ्या हातातली सिगरेट फेकायला जागा बघत होता , शेवटी पायाखाली टाकून त्याने सिगरेट विझवली .आत्ता दुसऱ्या हाताच काय करायचं ? अस काय करता मोबाईलवर बोलत बोलत आणखी दोन तीन काम केली पाहिजेत ना ? मग काय सायबाने दोन मांड्यांच्या मधली जागा घेतली ना खाजवायला… इंग्लिश बोलताबोलता खाजवायची मजाच वेगळी असेल, कोणाला माहिती?
काय सुचल आम्हाला आणि आम्ही समोरच्या म्हणजे मी मघाशी बाहेर पडलो त्या बालाजी मंदिराच्या गल्लीमध्ये जाऊन उभे राहून चहाचे घोट घेत होतो , माझा मित्र तोंडी लावायला सिगरेटचे झुरके घेत होता. आम्ही दोघे तसे चांगले मित्र पण आज बोलताना काय माहित काही टॉपिक निघत नव्हता. ती गल्ली तशी थोडी अंधार ओढलेलीच होती ,स्ट्रीट लाईटस् नव्हत्या तिथे. मंदिरात जाणारे म्हातारे, फुकटची गाडी पार्क करणारे, आणि गाडीवर बसून आडोसा एन्जॉय करणारे आणि आमच्या सारखे काही लोक त्या गल्लीमध्ये दिसत होते .आमच्या दोघांची गाडी , ” मग अजून काय बोलतोस ” वरच होती तेवढयात मघाच ते कपल दिसलं मला,मी त्या मुलीकडे बघितल, छान दिसत होती ती, माझ्या मित्राने पण पहिली,त्याला वाटल मी काहीतरी बोलेन, सही , आयटम वगैरे… मुलगा पण तसा ठीकच होता,पण खूप जपत होता तिला, आमच्या समोरच्या बाईकला कीक मारून हिरो हिरोइन निघून गेले. मी हसलो ,त्यावर मित्र बोल्ला , काय रे जुने दिवस आठवले का?
मी बोल्लो , नाय रे ,किती जीव लावत होता तो तिला, आणि काही दिवसांनी तिचं दुसरयाशीच लग्न होईल…
मित्र – मग हसायचं काय त्यात?
मी- अरे तिला तो मंदिरात घेऊन गेलेला…
मित्र- मग?
मी- चमडी म्याटर मध्ये देवतरी पडणारेय का?
आम्ही दोघांनी एकामेकांकडे पाहिलं… मित्राने उस्फूर्त दाद दिली, “यूया…”
आणि आम्ही दोघे हसायला लगलो…
अनुभव… च्यामारी अजून काय…

                                  ……………… क्रमश:

                                                                                                   © अविनाश उबाळे

एक प्रतिक्रिया

  1. सर, तुम्ही फार छान लिहिता वाचताना अगदी त्या जागेवर असल्याचा भास होतो अस वाटत त्यातल्याच एखद्या बाईक्स वर बसून तुमच्या गप्पा ऐकतोय.. खंत फक्त एवढीच की खाली असलेला तो क्रमशः मनाला टोचतो कारन तू तुमच्या येणाऱ्या पुढील ब्लॉग ची वाट पाहायला लावतो..

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा