पुणे: भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. चंद्रकांत पाटील हे पक्षाने दिल्लीहून लादलेले उमेदवार असल्याचे म्हटले आहे.
भाजपने पुणे शहराच्या महापौर पदासाठी नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. महापौर पदासाठी भाजपमध्ये अनेकजण इच्छुक होते. कोथरूड विधानसभा मतदारसंघात ऐनवेळी दिल्लीहून पक्षाने उमेदवार लादल्याने कोथरूडमध्ये इच्छुक असलेले मोहोळ नाराज असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यामुळे मोहोळ यांना महापौर देऊन त्यांची नाराजी दूर केली आहे.
सोमवारी (दि.१८)रोजी मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संजय काकडे बोलत होते.
काकडे यांनी यावेळी राज्यात कुठल्याही परिस्थितीत पुन्हा भाजपचेच सरकार येईल, असा दावा देखील केला. राज्यात दोन प्रादेशिक पक्ष एकत्र येणे शक्य नाही. या ३ पक्षाच्या आघाडीत खोडा पडणारच आणि हे चित्र ८ दिवसात स्पष्ट होऊन भाजपचे सरकार येईल.