जेईई मेनचा निकाल जाहीर, नंबर 1 रँकवर 18 जण

पुणे, 15 सप्टेंबर 2021: जेईई मेन 2021 सत्र 4 चे निकाल मंगळवारी रात्री उशिरा जाहीर झाले. या सत्रात 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. त्याचबरोबर 18 विद्यार्थ्यांनी रँक 1 मिळवला आहे. यावर्षी 7.32 लाख विद्यार्थ्यांनी JEE परीक्षा दिली. आंध्राचे सर्वाधिक 4 तर त्यापाठोपाठ राजस्थानचे 3, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तेलंगणाचे प्रत्येकी 2 विद्यार्थी टॉप 18 मध्ये आहेत. भाषिकदृष्ट्या तुलना केली तर सर्वाधिक 6 विद्यार्थी हे आंध्र-तेलंगणाचे आहेत. नंबर वन वर कर्नाटकचा गौरब दास आहे.

जेईई मेन 2021 सत्र 4 च्या परीक्षा 2 सप्टेंबर रोजी संपल्या आणि विद्यार्थी 8 सप्टेंबरपर्यंत तात्पुरत्या उत्तर कींवर आक्षेप नोंदवू शकले. यानंतर अंतिम उत्तर की जारी करण्यात आली. तेव्हापासून जेईई मेन्स 2021 चा निकाल jeemain.nta.ac.in वर प्रतिक्षिप्त होता.


जेईई मेन्स निकाल 2021: कसे बघाल

1: सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic वर जा.
2: जेईई मेन 2021 सत्र 4 निकाल लिंकवर क्लिक करा.
3: आता परीक्षा सत्र, अर्ज क्रमांक, जन्मतारीख प्रविष्ट करा.
4: जेईई मेन 2021 निकालाची प्रत डाउनलोड करा.


कशी होती परिक्षा?

विशेष म्हणजे बीई/बिटेकसाठी JEE मेन पेपर 1 मध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र आहेत तर पेपर 2 मध्ये गणित, अॅप्टीट्युड आणि ड्रॉईंग आहे. प्रश्न हे चार चार मार्क्ससाठी मल्टिपल चॉईस आणि न्यूमरीकल आधारीत होते. नेगेटीव्ह मार्किंगही होती.


JEE Advanced


यावर्षी 9.34 लाख उमेदवारांनी परिक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 77 टक्के उमेदवारांनी डबल परिक्षा दिली. 60 टक्के विद्यार्थी असे आहेत ज्यांनी स्कोअर वाढवण्यासाठी तीन वेळा परिक्षा दिली. जेईई मेन पेपर 1 आणि पेपर 2 च्या निकालाच्या आधारावर टॉपचे 2 लाख 45 हजार विद्यार्थी हे JEE Advanced साठी पात्र झालेले आहेत. ह्या एकमेव परिक्षेतूनच देशातल्या प्रमुख अशा 23 IITs(Indian Institutes of Technology ) प्रवेश मिळेल. जेईई अॅडव्हान्सची परिक्षा ही 3 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. जेईई मेन रिजल्ट जारी झाल्यानंतर लगेचच जेईई अॅडव्हॉन्ससाठी नोंदणी सुरु झालीय. टॉपचे 2 लाख 50 हजार विद्यार्थी जेईई अॅडव्हॉन्ससाठी पात्र आहेत. उमेदवार jeeadv.ac.in वर जाऊन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करु शकतात.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा