Realme चा नवीन 5G फोन 5,000mAh बॅटरीसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

21

पुणे, 27 सप्टेंबर 2021: Realme V11s 5G लाँच करण्यात आला आहे. Realme V11s 5G मध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसर, 6GB रॅमसह दिला आहे. त्याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आलाय.

Realme V11s 5G मध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी आहे. तसेच यात 128 जीबी स्टोरेज आहे. याची मेमोरी एका डेडिकेटेड मायक्रोएसडी स्लॉटसह 1TB पर्यंत वाढवता येते.

Realme V11s 5G ची किंमत

Realme V11s 5G ची किंमत CNY 1,399 (सुमारे 16,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. ही किंमत त्याच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसाठी आहे. त्याच्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. त्याची किंमत CNY 1,599 (सुमारे 18,200 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक आणि व्हायलेट रंगात सादर करण्यात आला आहे.

Realme V11s 5G ची वैशिष्ट्ये

ड्युअल नॅनो सिमवर चालणाऱ्या Realme V11s 5G मध्ये Android 11 आधारित Realme UI 2.0 देण्यात आला आहे. यात 6.5-इंच स्क्रीन आहे. या फोन मध्ये माली G57 GPU सह MediaTek Dimensity 810 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ते 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते.

त्याच्या मागील बाजूस ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. फोन चा प्रायमरी कॅमेरा 13-मेगापिक्सेलचा आहे. आणखी एक 2 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅशसह येतो. यात 5G, 4G, Wi-Fi, Bluetooth, GPS आणि कनेक्टिव्हिटीसाठी इतर पर्याय आहेत. यात 5,000mAh ची बॅटरी देण्यात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा