पुणे, 28 सप्टेंबर 2021: नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीनंतर न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्राच्या पहिल्या पानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीएम मोदींचा फोटो वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर छापलेला आहे. फोटोसह कॅप्शन लिहिलंय की, पृथ्वीची शेवटची सर्वोत्तम आशा. जगातील सर्वात प्रिय आणि सर्वात शक्तिशाली नेते आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत.
पंतप्रधान मोदींच्या फोटोच्या खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “महामहिम मोदी जी आपल्या देशाला आशीर्वाद देण्यासाठी 04 कागदांवर स्वाक्षरी करत आहेत, हर हर मोदी.
सत्य काय आहे?
व्हायरल फोटोचं सत्य जाणून घेण्यासाठी, आम्ही न्यूयॉर्क टाइम्सच्या वेबसाइटवर त्याची 26 सप्टेंबरची आवृत्ती तपासली. 26 सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर एका पुलाचा फोटो आहे. या फोटोसह, पोलिसांच्या हातून कोणाच्या मृत्यूच्या तपासाशी संबंधित बातम्या आहेत.
वेबसाइटवर न्यूयॉर्क टाइम्सच्या 26 सप्टेंबरच्या पहिल्या पानावर एक नजर टाकली की समजत व्हायरल झालेला फोटो एडिट केलेला आहे. पहिल्या पानावर, जिथं पुलाचा फोटो आहे, तिथं पीएम मोदींचा फोटो एडिट करण्यात आलाय.
हे स्पष्ट आहे की सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो एडिट केला आहे म्हणजे बनावट आहे.
तसेच हा लेख द न्यूयॉर्क टाईम्सचे एडिटर-इन-चीफ जोसेफ होप यांनी लिहिल्याचं म्हटलंय. या लेखात मोदींना धोकादायक देशभक्त म्हणण्यात आलं असून त्यांच्या नेतृत्वामुळे आणि राजकारणातील कौशल्यामुळे ते महाशक्ती बनू इच्छिणाऱ्या देशांसाठी धोका असल्याचं म्हटलंय. द न्यूयॉर्क टाईम्सचा हा फोटो फेसबुक आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केल जात आहे. या लेखाचं शिर्षक “मोदी कोण आहेत, न्यूयॉर्क टाईम्सचे एडिटर-इन-चीफ जोसेफ होप यांचा लेख” असं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे