पुणे, 18 ऑक्टोंबर 2021: सध्या राज्यात इडी आणि सीबीआय मोठ्या प्रमाणावर कारवाई करताना दिसत आहे. ड्रग्स असो किंवा मनी लॉन्ड्रिंग यावरून सध्या राज्य चर्चेचा विषय राहिले आहे. खास करून आघाडी सरकारातील नेत्यांविरोधात कारवाई जोरात चालू आहे. यावरून यापूर्वी ही शरद पवार यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं होतं. आता पुन्हा त्यांनी यावर वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राला आर्थिक संकटात आणण्याचा प्रयत्न करून दुसऱ्या बाजूने सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. ईडी, सीबीआय, नार्कोटिक चा वापर करून सत्तेत असलेल्या व्यक्तींना संकटात आणण्याच काम भाजप करत असल्याचे राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवार पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकर्त्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. ईडी…सीडी, सीबीआय चा वापर केला तरी हे सरकार पाच वर्षे काम करणार असल्याचे यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की, काय तुमची ईडी,सीडी, सीबीआय वापरायचं ते वापरा महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच सरकार निवडून दिलेलं आहे. किती प्रयत्न केले तरी हे सरकार पाच वर्षे काम करणार. अस ठाम पणे पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, दिल्लीतील सरकार ची जबाबदारी आहे की राज्याला शक्ती द्याची, राज्याला मदत करायची, जनता राज्यात असते. मात्र तस होताना दिसत नसल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले की, महागाई चा भडका झाला आहे. पेट्रोल, डिझेल चे दरवाढ झाली आहे. पेट्रोल ची जगात किंमत वाढली हे कारण केंद्राला सांगण्यासाठी होत. पण, जगात किंमत कमी झाली, तरी ही देशात वाढत्याच किंमती ठेवल्या. पुढे ते म्हणाले की, इंग्रजी दैनिकात माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांचा एक लेख आहे. त्यात त्यांनी सांगितलं आहे की, केंद्रसरकार ने पेट्रोल, डिझेलवर जो कर बसवला आहे त्यातील २५ टक्के कमी केला तर महागाईला तोंड देण्याची परिस्थिती सामन्यांमध्ये निर्माण होईल. मात्र हे सरकार त्यावर विचार करण्यास तयार नाही. असे देखील पवार म्हणाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे