केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ED आणि CBI प्रमुखांचा कार्यकाळ 2 वरून 5 वर्षांनी वाढवला

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2021: अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआयच्या प्रमुखांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. आता ईडी आणि सीबीआय प्रमुखांचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

भारत सरकारने ईडी आणि सीबीआयच्या संचालकांचा कार्यकाळ 5 वर्षांनी वाढवण्याचा अध्यादेश आणला आहे. सध्या ईडी आणि सीबीआयच्या प्रमुखांचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे. देशातील सीबीआयचे सध्याचे प्रमुख सुबोध जैस्वाल आणि ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा आहेत.

1+1+1 करून 3 वर्षांची मुदतवाढ

नव्या अध्यादेशानुसार सीबीआय आणि ईडी प्रमुखांची नियुक्ती पहिल्या दोन वर्षांसाठी केली जाणार आहे. यानंतर, तीन वर्षांसाठी (1+1+1) मुदतवाढ दिली जाईल. प्रत्येकी एक वर्षासाठी तीन मुदतवाढ दिली जाऊ शकते. परंतु ते एकूण 5 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा