J-K: सुरक्षा दलांना मोठे यश, शिक्षकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यासह 3 ठार

काश्मीर, 25 नोव्हेंबर 2021:काश्मीर खोऱ्यात दहशतवादाविरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. श्रीनगरच्या रामबागमध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. रामबागमध्ये ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख टीआरएफ कमांडर मेहरान धल्ला अशी झाली आहे.

सुपिंदर कौर आणि एक पंडित शिक्षिका या दोन शिक्षकांच्या हत्येत धल्लाचा सहभाग होता. श्रीनगरमधील नागरिकांच्या हत्येतही त्याची महत्त्वाची भूमिका होती. संपूर्ण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांचे हल्ले सुरूच आहेत.

ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव मंजूर अहमद मीर असे असून तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. तिसऱ्या दहशतवाद्याच्या ओळखीबाबत आयजीपी विजय कुमार म्हणाले की, मृत दहशतवाद्याचे कुटुंब अद्याप घटनास्थळी पोहोचलेले नाही, त्यामुळे त्याची ओळख पटलेली नाही.

या कारवाईबाबत जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीजीपी दिलबद सिंग म्हणाले की, चकमकीत एकाही नागरिकाला जीव गमवावा लागला नाही.
दहशतवाद्यांनी नागरिकांची हत्या करून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुरक्षा दलांनी आपली कारवाई तीव्र केली आहे.

शनिवारी कुलगाममध्ये एका दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी ठार केले. कुलगाममध्ये लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली.
एका कार्यक्रमादरम्यान जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले होते की, काही लोक खोऱ्यातील वातावरण बिघडवण्याचे काम करतात. येत्या दोन वर्षांत खोऱ्यातून दहशतवादाचा नायनाट केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी सर्वांना दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा