नवी दिल्ली: सध्या अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये सुरू असलेला ट्रेड वॉर मुळे चीनमधील बऱ्याच कंपन्या संभाव्य धोक्यामुळे बाहेर पडत आहेत व उत्तम संधी असलेल्या देशांमध्ये प्रस्थापित होत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अनेक विदेशी कंपन्यांना भारतात आमंत्रित केले आहे. पाच जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक बजेट मध्ये सरकारने परकीय गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणावर कर लावला होता त्यामुळे भारताला चीन आणि अमेरिका यांच्यातील ट्रेड वॉर चा फायदा घेता आला नव्हता: परंतु काही दिवसांपूर्वी भारत सरकारने आपले घेतलेले हे पाऊल मागे घेतले त्यामुळे आशिया खंडामध्ये सर्वात कमी कर असलेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश होतो.
या संधीचा फायदा घेण्यासाठी व भारतासारखी मोठी अर्थव्यवस्था काबीज करण्यासाठी विविध कंपन्या भारतामध्ये येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने टेसला इन्कॉपोरेशन आणि ग्लॅक्सो स्मितक्लाईन यांसह सुमारे ३२४ कंपन्यांना देशात उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचे आमंत्रण दिली आहे. चीन आणि अमेरिकेत दरम्यान सुरू असलेल्या ट्रेड वॉर चा लाभ घेत भारतात नवे उत्पादन किंवा निर्मिती प्रकल्प कंपनी सुरू करावेत यासाठी भारत प्रयत्नशील आहे. एका इंग्रजी संकेतस्थळावर यासंदर्भात अहवालाची माहिती देण्यात आली आहे. सरकार या प्रकल्पांना आवश्यक जमिनी बरोबरच ऊर्जा, पाणी आणि इतर पायाभूत सुविधा पुरवणार आहे.