Redmi Note 11T पुढील आठवड्यात होतोय लॉन्च, काय असतील फीचर्स

पुणे, 27 नोव्हेंबर 2021: चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi आपला पुढचा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.  Redmi Note 11T भारतात 30 नोव्हेंबर रोजी लॉन्च होत आहे.  पुढील आठवड्यात लाँच होणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये काय खास असंल?
वास्तविक Redmi Note 11 सीरीज चीनमध्ये गेल्या महिन्यात लॉन्च करण्यात आली होती.  या सीरीज अंतर्गत, Redmi Note 11, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ लाँच करण्यात आले.
कंपनी Redmi Note 11 भारतात Redmi Note 1T नावाने लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.  याचा टीझर रिलीज झालाय.  भारतात, कंपनी सध्या Redmi Note 11 मालिकेचे सर्व प्रकार लॉन्च करणार नाही.
 Redmi Note 11T बद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 5G सपोर्ट दिला जाईल.  या सेगमेंटमध्ये Xiaomi कडून कोणतेही 5G स्मार्टफोन नाहीत.  फोनची वैशिष्ट्यं चीनमध्ये लॉन्च झालेल्या Redmi Note 11 प्रमाणेच राहण्याची अपेक्षा आहे.
Redmi Note 11T मध्ये हाय रिफ्रेश रेट सपोर्ट असेल.  तुम्हाला या फोनमध्ये AMOLED पॅनल मिळणार नाही, कारण यात LCD डिस्प्ले आहे.  6.6 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जाईल.
Android 11 आधारित MIUI 12.5 Redmi Note 11T मध्ये दिला जाईल.  या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 810 चिपसेट दिला जाऊ शकतो. Redmi Note 11T चा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल दिला जाऊ शकतो.
Redmi Note 11T मध्ये 33W फास्ट चार्ज सपोर्ट दिला जाऊ शकतो.  हा स्मार्टफोन तीन प्रकारात सादर केला जाऊ शकतो.  यामध्ये 6GB RAM 64GB स्टोरेज, 6GB RAM 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सपोर्ट असंल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा