१०५ वर्षीय अम्माने दिली चौथीची परीक्षा

नवी दिल्ली : शिक्षण व वयाचा काहीही संबंध नसतो असे म्हणतात. आज त्याचा प्रत्यय आला. केरळमधील भागीरथी अम्मा यांनी वयाच्या १०५ व्या वर्षी चौथीची परीक्षा दिली आहे. ही परीक्षा देणाऱ्या त्या सर्वात बुजुर्ग महिला ठरल्या आहेत.

भागीरथी अम्मा यांच्या पतीचा ७० वर्षांपूर्वी मृत्यू झाल्यानंतर प्रचंड संघर्षातून ४ मुली व २ मुलांचे पालनपोषण केले. ऐन तारुण्यात मुलांची जबाबदारी आल्याने त्यांची शाळेची इच्छा अपूर्ण राहिली होती. तिसरीला असतानाच त्यांना शाळा सोडावी लागली होती.
मंगळवारी(दि.१९) रोजी त्यांनी चौथीची परीक्षा दिली. अम्मा परीक्षा केंद्रात आल्यानंतर प्रतिष्ठीत व्यक्तिंच्या हस्ते त्यांना प्रश्नपत्रिका देण्यात आली. विशेष म्हणजे केरळच्या साक्षरता मिशनच्या प्रोत्साहनामुळेच त्या परीक्षा देऊ शकल्या. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा