हिवाळी थंडी जशी गोड वाटते, तिची चाहूल जरी गोड वाटल्या तरी अधिवेशन म्हंटलं का ही थंडी कुठल्या कुठे पळून जाते. अधिवेशन गाजले ते आज अनेक मुद्द्यांनी. पण आज अधिवेशनातून बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यंमांसमोर आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले . नुकतीच महाविकास आघाडीला दोन वर्षे पूर्ण झाली आणि फडणवीसांनी मविआवर तोंडसुख घेतले.
यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरुन मविआस वेठीस धरले. सध्या गाजत असलेला मुद्दा म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचा संप. एसटी अनंत काळ बंद राहू शकत नाही. कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरच सोडवले पाहिजेत. हा संप आघाडी सरकारला नीट हाताळता आला नाही, हे त्यांनी यावेळी नमूद केले.
शिवसेना आणि भाजप कधीच मित्रपक्ष होणार नाही. त्यामुळे त्यांनी आता आशा सोडावी. जेवायला बोलावले तर जाईन, पण पक्ष मित्र कधीच होणार नाही, याची नोंद करुन ठेवा, असे फडणवीसांनी माध्यमांना सांगितले.
घरच्या राजकारणाबद्दल बोलताना सांगितले की माझी पत्नी अमृता कधीच राजकारणात येणार नाही, तेव्हा हे राजकारण इथेच थांबवा, असेही त्यांनी सांगितले. जीएसटीवरुन त्यांनी राज्यसरकारला खडेबोल सुनावले. जीएसटीचा दर वाढवला. पण हे सरकार केवळ भ्रष्टाचाराचे सरकार आहे, असा आरोप त्यांनी केला.
राज्यात सरकार आहे, पण शासन नाही. सरकार आहे, पण गुंतवणूक नाही. संकटकाळात भाजप मैदानात उतरले. पण सरकारचे अस्तित्व दिसलं नाही. अनेक योजना जाहीर केल्या. आश्वासन दिले . पण योजना जनतेपर्यंत पोहोचल्या नाही. त्यामुळे हे सरकार निष्प्रभ ठरले.
अधिवेशन केवळ पाचच दिवस का?असं म्हणत त्यांनी अधिवेशनाचा दिवस गाजवला. आता अधिवेशनात पुढे काय होणार हे पाहण औत्सुक्याचं ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस