2,000 रु. च्या नोटांची संख्या घटली, संख्या घटून चलनात असलेल्या एकूण नोटांच्या 1.75% वर

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2021: चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांची संख्या मार्च 2018 मधील 336.3 कोटी नोटांच्या तुलनेत यावर्षी नोव्हेंबरमध्ये 223.3 कोटी नोटा म्हणजेच एकूण चलनात असलेल्या नोटांच्या (NIC) 1.75 टक्के इतकी कमी झाली आहे.
 विशिष्ट मूल्याच्या नोटांच्या छपाईचा निर्णय सरकारने रिझव्‍‌र्ह बँकेशी सल्लामसलत करून जनतेच्या व्यवहाराची मागणी सुलभ करण्यासाठी इच्छित मूल्यांचे मिश्रण राखण्यासाठी केले आहे, असे अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले.
31 मार्च 2018 रोजी चलनात असलेल्या रु. 2,000 मूल्याच्या बॅंक नोटा 3,363 दशलक्ष नग (mpcs) च्या तुलनेत टर्म्स ऑफ वोल्युम आणि मूल्याच्या दृष्टीने NIC च्या अनुक्रमे 3.27 टक्के आणि 37.26 टक्के आहेत.  26 नोव्हेंबर 2021 रोजी 2,233 mpcs चलनात होते, जे व्हॉल्यूम आणि मूल्याच्या दृष्टीने NIC चे अनुक्रमे 1.75 टक्के आणि 15.11 टक्क्यांवर आले आहे. चौधरी पुढे म्हणाले की, 2018-19 पासून नोटांसाठी चलन छापखान्यात कोणताही नवीन इंडेंट ठेवण्यात आलेला नाही.
नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांचे चलन कमी होण्याचे कारण म्हणजे 2018-19 पासून या नोटांच्या छपाईसाठी कोणताही नवीन इंडेंट ठेवण्यात आलेला नाही. याबरोबरच दुसरे कारण असे की, दैनंदिन वापरात बऱ्याच नोटा फाटतात किंवा गहाळ होतात याचादेखील नोटांच्या संख्येवर थोडाफार परिणाम होतो, असे चौधरी यांनी सांगितले.
सरकारने घातली होती नोटबंदी
8 नोव्हेंबर 2016 रोजी सरकारने इतर उद्दिष्टांसह काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी तत्कालीन प्रचलित 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. नोटाबंदीनंतर 2,000 रुपयांची नोट आणि 500 ​​रुपयांची नवीन नोट बाजारात आली.  नंतर 200 रुपयांच्या नोटाही चलनात आल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा