अण्णा हजारेंचा आरोप, साखर कारखान्याच्या विक्रीत 25 हजार कोटींचा घोटाळा, अमित शहांना पत्र

नवी दिल्ली, 26 जानेवारी 2022: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारी ‘एक चतुर्थांश दरानं’ विकल्याचा आरोप केला आहे. त्यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र लिहून कथित २५ हजार कोटींच्या ‘घोटाळ्याची’ सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करण्याची मागणी केलीय.

शहा यांना लिहिलेल्या पत्रात हजारे यांनी कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची विनंती केलीय.

हजारे यांनी लिहिलं की, “2009 पासून आम्ही साखर कारखानदारांच्या कवडीमोल भावाने विक्री आणि सहकारी वित्तीय संस्थांमधील अनियमिततेच्या विरोधात आंदोलन करत आहोत. 2017 मध्ये आम्ही मुंबईत तक्रार दाखल केली आणि तक्रारीची चौकशी करण्यासाठी डीआयजी स्तरावरील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली.

25,000 कोटींच्या घोटाळ्यावर महाराष्ट्र सरकार कारवाई करत नसंल तर कारवाई कोण करणार?, असा सवाल ज्येष्ठ भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केला.

हजारे म्हणाले, “महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या विक्रीची केंद्रानं उच्चस्तरीय समिती स्थापन करून चौकशी केल्यास ते एक उत्तम उदाहरण ठरंल, असा आमचा विश्वास आहे.” हजारे यांनी मात्र कोणत्याही सहकारी साखर कारखान्याच्या नावाचा उल्लेख केला नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा